पुणे : चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या जीपचा नोएडाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात बारामतीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून या गाडीतून सातजण प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा चालक तसेच निपाणी येथील मुजावर कुटुंबातील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. चारधाम यात्रेसाठी महाराष्ट्रातून पन्नास लोक निघाले होते. काल रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. नोएडापासून काही अंतरावर जेवर या गावाजवळ डंपरला जीपने मागून धडक दिली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपक्ष निवडणूक ते नवीन संघटनेची घोषणा, संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील ११ ठळक मुद्दे
या अपघातामध्ये बारामतीतील चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे हे दाम्पत्य, रंजना भरत पवार आणि मालन विश्वनाथ कुंभार या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर जीप चालक नारायण कोळेकर यांच्यावर नोएडामधील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे

Photos : मांजर समजून बिबट्याचा बछडा आणला घरी, चिमुकलीच्या पराक्रमाने सगळेच धास्तावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here