मुंबई- अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘थार’ सिनेमात दिसला. हर्षवर्धनने यावेळी वडील अनिल कपूर त्याला आर्थिक मदत कशी करत नाहीत तेही सांगितलं. मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने स्वतःशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या.

एक अफवा आणि लग्न होईना! कंगना रणौतने सांगितलं का मिळत नाहीए तिला परफेक्ट पार्टनर

हर्षवर्धनने सांगितलं की, तो ३ कोटी रुपयांची नवीन लॅम्बोर्गिनी घेण्याऐवजी सेकंड हँड लॅम्बोर्गिनी घेण्याचा विचार करत आहे. ज्याची किंमत १ कोटी रुपये आहे. तो म्हणाला, ‘मला हे प्रेक्षकांसमोर सांगायला आवडत नाहीए, पण सत्य हेच आहे की माझ्या अवाजवी खर्चासाठी पैसे देण्यात आई- वडिलांना अजिबातच रस नाही. माझी इच्छा आहे की तुम्हाला जे वाटतं की माझे आई- बाबा माझा सर्व खर्च उचलतात ते खरं असावं पण तसं नाहीए. बाबांनी माझा खर्च उचलला असता तर माझ्याकडे जे आहे त्यापेक्षा १० पट जास्त असतं. पण तसं नाहीए, मी माझ्या वस्तू स्वतः विकत घेतो.’

स्क्रीनशॉट

हर्षवर्धनच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर युझर्सच्या प्रतिक्रिया येऊ लागले आहेत. एकाने लिहिले की, ‘मला अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसारखं दुःखी व्हायचं आहे.’ तर दुसऱ्या युझर्सने लिहिले, ‘बिचार्‍याला जुनी लॅम्बोर्गिनी घ्यायची आहे.’

स्क्रीनशॉट

एकाने त्याला बॉलीवूडचा राम बहादूर करत लिहिलं की, ‘हर्ष तुझी कथा शेअर केल्याबद्दल धन्यवाद, तू खूप धाडसी आहेस. तुझ्यासाठी प्रार्थना बॉलिवूडच्या राम बहादूरांवर थोडी दया दाखवा.’ अजून एका नेटकऱ्याने लिहिलं की, ‘त्यांचा संघर्ष खरा आहे.’ दुसर्‍याने लिहिले, ‘देवा, आम्हाला या जन्मात एवढेच दु:ख दे.’ एकामागोमाग एक येत असलेल्या कमेन्टमध्ये युझर्स म्हणाले की, ‘हर्षवर्धन कपूरचं दुःखी जीवन. आपण त्याला गाडी विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करू शकतो. हर्षवर्धन कपूरच्या वेदना मला जाणवत आहेत.’

स्क्रीनशॉट

Video- १५८ जीव मारण्याचा एकच पर्याय त्यांच्याकडे आहे का? सयाजी शिंदेंचा संतप्त सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here