कोलंबो : श्रीलंकेतील जनजीवन सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर आता हळू हळू पूर्व स्थितीमध्ये येताना दिसत आहे. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी त्यांच्याकडील कार्यकारी अधिकार सोडल्यानंतर आता यूएनपीचे नेते रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. विक्रमसिंघे आज सायंकाळी ६.३० वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी माहिती यूएनपीकडून देण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे आणि विक्रमसिंघे यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. रानिल विक्रमसिंघे यांनी यापूर्वी पाच वेळा पंतप्रधान भूषवलं आहे.
‘तुळजापूर मंदिरातील निजामकालीन कलम ३६ छत्रपतींना लागू होत नाही’
रानिल विक्रमसिंघे यांची भारत समर्थक म्हणून ओळख
श्रीलंकेचं पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या रानिल विक्रमसिंघे यांना भारत समर्थक म्हणून ओळखले जातात. रानिल विक्रमसिंघे हे पंतप्रधान झाल्यानं भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता आहे. महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेत हिंसक घटना झाल्या होत्या. आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांचं खासगी निवासस्थान पेटवलं होतं. महिंदा राजपक्षे यांचं शासकीय निवासस्थान देखील पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मंत्रालयाजवळच तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; आक्रोश करत मांडली व्यथा
डेली मिररच्या रिपोर्टनुसार रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मंदिराला भेट देणार आहे. त्यानंतर ते सूत्रं स्वीकारतील. दुसरीकडे महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाला त्रिंकोमाली येथे नौदालाच्या तळावर ठेवण्यात आलं आहे. जोपर्यंत देशातील स्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत महिंदा राजपक्षे तिथे राहण्याची शक्यताआहे.

महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी हिंसाचार उसळला होता. राजपक्षे विरोधक आणि समर्थकांमध्ये झटापट झाली होती. यानंतर देशभर हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. एका खासदारासह ८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर, २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी देशभर कर्फ्यू लागू केला होता. आता हळू हळू स्थिती सामान्य होत असल्यानं कर्फ्यूमधून थोडावेळ सूट देण्यात आली होती. श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यानंतर सर्वात मोठ्या आर्थिक संकाटाचा ते सामना करत आहेत. परकीय चलनाच्या तुटवड्यामुळं श्रीलंका आर्थिक संकटात सापडली आहे. राजपक्षे सरकार विरोधात ३१ मार्चपासून आंदोलन करण्यात आलं होतं.

शिर्डीत अनधिकृत अतिक्रमणावर नगरपरिषदेनं चालवला हातोडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here