हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ होत असून तापमान ४० ते ४२ अंशावर आहे. त्यामुळे नागरिक घामाघूम होत असून याचा फटका पिकांनाही बसत आहे. वारंगा फाटा (ता. कळमनुरी) परिसरातील केळी पिकातील ओलावा कमी होत असल्याने पाने जळून जात असून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कळमनुरी तालुक्‍यातील वारंगा फाटा परिसरातून इसापूर धरणाचा कालवा जातो. या कालव्यावर हजारो हेक्‍टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी ऊस, केळी, हळद ही नगदी पिके घेतात. तसेच उन्हाळ्यातदेखील कालव्याला पाणी सोडल्यास भुईमुगाचे पीक घेतले जाते.

मोठ्या प्रमाणात केळीची लागवड…

वारंगा फाटा गावासह डोंगरकडा, सुकळीवीर, जामगव्हाण, जवळा पांचाळ, दिग्रस बुद्रुक, दांडेगाव, हिवरा, वरुड, रेडगाव, वडगाव या गावांसह परिसरात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. उत्तम नगदी पीक म्हणून या बारमाही पिकाकडे शेतकरी पाहतात.

छत्रपती संभाजीराजेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखणं नियमानुसार होतं का?

तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान…

मागील वर्षी केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळाल्यामुळे या वर्षीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली आहे. भाव चांगला मिळणार या आशेवर केळी संगोपनावर मोठा खर्चही करण्यात आला आहे. मात्र, तापमानात झालेली वाढ केळी पिकाच्या मुळावर आली आहे. कधी नव्हे ते वाढलेल्या तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान होत आहे. २० ते ३० टक्के घट होण्याची भीती दरवर्षी मे महिन्यातील तापमान ३८ ते ४० अंशांवर असते. या वर्षी हे तापमान ४२ अंशांपर्यंत गेले आहे. त्यामुळे केळी पीक चांगलेच अडचणीत सापडले असून पाने जळत आहेत. असेच तापमान राहिल्यास उत्पादनात २० ते ३० टक्के घट होण्याची भीती उत्‍पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

‘तुळजापूर मंदिरातील निजामकालीन कलम ३६ छत्रपतींना लागू होत नाही’
२० ते ३० टक्के घट होण्याची भीती…

यंदा २० ते ३० टक्के घट होण्याची भीती केळीचे पीक उन्हाला हळवे असून वाढलेल्या तापमानामुळे त्याचे विपरित परिणाम जाणवत आहेत. मागील वर्षी एप्रिल ते मे महिन्यात केळीला १४०० ते १८०० रुपये क्विंटलचा दर मिळत होता. मागील दोन वर्षात लॉकडाउनमुळे तो २५० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलवर आला होता. यात लागवड खर्च निघणेही अवघड झाले होते. त्यात तापमानात वाढ होत असल्याने पिकावर परिणाम होत आहे.

‘या’ पोर्टेबल पंख्यांसमोर एसी देखील फेल, किंमत १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये; पाहा लिस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here