पुणे (पिंपरी चिंचवड) : पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत दिवसाढवळ्या फायरिंग करून खून करणाऱ्या मोक्कातील दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दत्त जयंतीच्या दिवशी केली होती हत्या

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती दिली की, १८ डिसेंबर २०२१ रोजी दत्त जयंती कार्यक्रमावेळी काटे परम येथील मुख्य चौकात आरोपी गणेश मोटे याने त्याच्या साथीदारांसह भर दिवसा फायरिंग करून योगेश जगताप नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. त्यानुसार त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ते दहशत निर्माण करून अर्थजन करत असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला.

खुशाल टीका करा पण ती कविता म्हणजे कष्टकऱ्यांची व्यथा, शरद पवारांचं भाजपला सडेतोड प्रत्युत्तर
या गुन्हयातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. मात्र, ते त्याच प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता असल्याने पहिले आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते. या गुन्हयातील आरोपी बबलु नायर व निखील गाडुते यांच्यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी हे पनवेल नवी मुंबई परिसरात लपून बसले असल्याचे निष्पन्न झाले.

पनवेलमधून घेतलं ताब्यात

त्यानंतर पोलिसांचे एक पथक पनवेल येथे रवाना केले. सदर आरोपी पनवेल ग्रामीण हद्दीत कसून चौकशी केली असता राजन ऊर्फ बबलू रवी नायर, रा. जुनी सांगवी, पुणे व आरोपी नामे निखील ऊर्फ डोक्या अशोक गाडुते, रा. जुनी सांगवी, कोनगाव परिसरात असलेल्या एका उंच इमारतीचे २० व्या मजल्यावर एका फ्लॅट मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलीसांच्या मदतीने ९ मे रोजी पहाटे या ठिकाणी जावून त्यांचा शोध घेतला असता हे आरोपी जवळ असलेल्या इमारतीच्या २० मजल्यावरील फ्लॅट मध्ये असल्याची माहिती मिळाली.

ज्ञानव्यापी मशिदीचा सर्व्हे होणारच; मुस्लिम पक्षकारांची मागणी कोर्टाने फेटाळली
पोलिसांनी जिव धोक्यात घालून केली अटक

त्यानंतर, आरोपींना हॉटेलमधील स्टाफने दार उघडण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी दार न उघडता त्यांनी फ्लॅट मधील गॅलरी जवळील ड्रेनेज पाईपने खाली उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पथकाने त्यांचा जिव धोक्यात घालून सदर आरोपींना ड्रेनेज पाईप वरुन उतरत असताना १८ व्या मजल्यावरुन ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

LED Projector: घरीच अनुभवता येणार थिएटरची मजा, भन्नाट फीचर्ससह नवीन LED प्रोजेक्टर लाँच, पॉवर बँकवरही करेल काम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here