नांदेड : नांदेड – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि महामंडळाच्या बसची समोरासमोर जबरदस्त धडक होऊन बस मधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना दोन १०८ च्या रुग्णवाहिका आणि राष्ट्रीय महामार्गावरील वसमत फाटा येथील एक रुग्णवाहिका अशा तीन रुग्णवाहिकाच्या मदतीने नांदेडच्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नांदेड – नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर पार्डी म. गावाजवळ असलेल्या गुरुद्वाराजवळ नांदेड कडून हदगावकडे जाणारी बस आणि वारंगा कडून नांदेड जाणारा ट्रक यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यावेळी शेतामध्ये काम करणारे शेतकरी श्याम मरकुंदे, नारायणराव देशमुख यांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र, त्याठिकाणी बसचा चालक आणि एक प्रवासी महिला अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी अर्धा तासाच्यावर अवधी लागला. या अपघातात ट्रक चालक आणि बस चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

राज्यकर्त्यांनो अजून किती मुडदे पाडणार आहात, अतिरिक्त ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा सवाल
पार्डी म. येथील तरुणांनी केली मदत

अपघाताची माहिती मिळताच अपघात स्थळी पार्डी म. येथील तरुण धावत गेले आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि बस चालकाला सुखरूप बाहेर काढले. यावेळी शंकर हापगुंडे, श्याम गिरी, गजानन हापगुंडे, मारोती कवडे, मुरलीधर कांबळे, प्रेम ठाकूर, चांदू कांबळे, बंडू मदने आदी तरुणांनी बसमध्ये अडकलेल्या चालकाला आणि एक प्रवाशी महिलेला बाहेर काढले. तसेच अपघातग्रस्तांना अँबुलन्समध्ये पाठवत महामार्ग पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

काशीमधील मंदिराच्या तळघरात सापडली होती राणी… काँग्रेस नेते पट्टाभि सीतारमय्या यांनी लिहिलेली ज्ञानव्यापी मशिदीची कहाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here