बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी आमच्या सर्वात मोठ्या नेत्याची म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी. आतापर्यंत जे झालं ते झालं, तुम्ही नरेंद्र मोदींची माफी मागा. बृजभूषण सिंह यांनी तुम्हाला संतांची माफी मागायची नसेल तर नरेंद्र मोदींची माफी मागावी, तुम्ही उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा भेद करु नका, मी तुमच्या दौऱ्याचा विरोध मागं घेईन, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.
त्यांचं आंदोलन महाराष्ट्राविरोधात नाही : शरद पवार
बृजभूषण सिंह यांचा वाद हा महाराष्ट्राविरोधात नाही. एखाद्या व्यक्तीनं एक वक्तव्य केलं. त्यानं एखाद्या राज्यातील समुदाय दुखावला जातो. त्यावरुन एखादं वक्तव्य केलं तर ते संपूर्ण महाराष्ट्राविरोधातील आहे, असं होत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंचा ५ जूनला अयोध्या दौरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी करण्यात येत आहे. दुसरीकडे युवासेना प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.