धुळे : शिरपूर तालुक्यातील हिसाळे शिवारात असलेल्या गोरक्षनाथ पाड्यावर तीन जिवंत काडतूस आणि एक गावठी कट्टा पोलिसांच्या हाती लागले आहे. गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे असल्याची गुप्त माहिती धुळे एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्याआधारे धुळे एलसीबीच्या पथकाने छापा टाकला खरा मात्र, याची चाहूल संशयिताला लागल्याने तो त्या ठिकाणाहून फरार झाला आहे.

धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, गोरक्षनाथ पाड्यावर अत्तर सिंग गुजा पावरा याने घरात गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे ठेवले आहे. क्षणाचा विलंब न करता हेमंत पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, प्रभाकर बैसाने, श्रीकांत पाटील, संजय पाटील, मयुर पाटील, तुषार पारधी, महेंद्र सपकाळ यांना सोबत घेऊन हिसाळे येथील गोरक्षनाथ पाड्यावर अत्तर सिंग पावरा यांच्या घरावर छापा टाकला याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत अतरसिंह तेथून पसार झाला.

ओवेसींची औरंगजेबाच्या कबरीला भेट, भाजप म्हणाले, ‘औरंगजेबाची औलाद असल्याचं दाखवलं!’
मात्र, त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता २५ ते ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व १५०० रुपये किमतीचे तीन जिवंत काडतूसे धुळे एलसीबीच्या हाती लागले आहे. त्याने हा गावठी कट्टा आपल्या घरात कुठल्या हेतूसाठी ठेवला होता, त्याचा काही घातपाताचा कट तर नव्हता ना? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धुळे एलसीबी पुढील तपास करीत आहे.

रुक्मिणीमातेच्या पायांची झीज; जबाबदार असणाऱ्यांवर होणार कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here