शमिता शेट्टीसाठी राकेश बापटनं सोडलं पुणे,शेअर केले मुंबईच्या घराचे Photo

कंगनाचं असं म्हणणं आहे की हॉलिवूडपटातील ही काल्पनिक पात्र भारतीय पौराणिक कथांमध्ये प्रत्यक्षात होऊन गेलेली आहेत. हॉलिवूडपटातील थॉरची तुलना कंगनाने हनुमानाशी केली आहे तर आयर्न मॅनला तिने महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेपासून प्रेरणा घेऊन साकारल्याचं म्हटलं आहे. पण या सुपरहिरो व साहसी पात्रांना अमेरिकन कॉमिक्समधून प्रेरित होऊन पडदयावर आणल्याचं सांगण्यात येतं. कंगनाने मात्र त्याला छेद देत त्या पात्रांचं मूळ भारतीय पौराणिक कथांमध्ये असल्याचं मांडलं.

कंगना सध्या तिच्या धाकड या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या सिनेमात तिची भूमिका डॅशिंग मुलीची आहे. यावरूनच सिनेमातील सुपरहिरो संकल्पनेची चर्चा सुरू असताना कंगनाने तिचं बिनधास्त मत नेहमीप्रमाणंच मांडलं. जर तुला सुपरहिरोची भूमिका करायची झाली तर तू हॉलिवूडमधील व्यक्तिरेखा निवडशील की भारतीय पुराणकथेतून प्रेरणा घेणार, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली, जर अशी संधी मिळाली तर मी अर्थातच भारतीय पुराणातील व्यक्तिरेखेला प्राधान्य देईन.
अबब! ही थाळी पाहून रणवीर सिंग झाला वेडा, Photo पाहून तुम्हालाही लागेल भूक

‘हॉलिवूडपट हे भारतीय पुराणकथेपासूनच प्रेरणा घेतात. आयर्न मॅनचं कवच हे महाभारतातील कर्णासारखंच आहे. थॉरचा लुक आणि हातातील हाथोडा पाहिल्यास हनुमानाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. हॉलिवूडपटात हे सगळं दाखवण्याची शैली वेगळी असली तरी सुपरहिरोची स्टोरी मात्र भारतीय पुराणकथेतूनच घेतली जाते. त्यामुळे मला संधी मिळाली तर मी हॉलिवूडच्या काल्पनिक सुपरहिरोपेक्षा जे मूळ आहे तेच निवडेन,’ असंही कंगना म्हणाली.