मुंबई : जयेशभाई जोरदार बनून लवकरच पडद्यावर झळकणाऱ्या रणवीर सिंगवर तरुणी नेहमीच फिदा असतात. सध्या रणवीर सिंग त्याच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणवीर प्रसिध्दीच्या झोतात आहे. पण रणवीर त्याच्या खाजगी आयुष्यातील चर्चेमुळेही चाहत्यांच्या नजरेत येत असतो. दीपिका पादुकोणशी लग्न करून तो सध्या एकपत्नीव्रत जपत असला तरी एकेकाळी बॉलिवूडमधील चार अभिनेत्रींवर त्याचा जीव जडला होता. त्याच्या अफेयर्सची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा त्या चार अभिनेत्रींचीही नावं समोर येतात.

रणवीर दीपिका

धमेंद्र आणि हेमामालिनी यांची मुलगी आहना देओलचं नावही एकेकाळी रणवीर सिंगसोबत जोडलं गेलं होतं. आहना जरी बॉलिवूडची अभिनेत्री नसली तरी ती हेमामालिनीची मुलगी असल्याने बॉलिवूडमध्ये वावरत असते. पण रणवीर आणि आहना एकाच कॉलेजमध्ये होते, तेव्हाच रणवीर तिच्या प्रेमात पडला होता. पण आहनाने रणवीरची साथ सोडली. ज्याच्यासाठी आहनाने रणवीरशी ब्रेकअप केलं तो आदित्य रॉय कपूऱ् असल्याचंही बोललं जातं. आहना आणि आदित्य रॉय कपूर यांची गाडी काही पुढे गेली नाही पण रणवीर मात्र आहनापासून कायमचा दुरावला.

थाॅर म्हणजे हनुमान तर आयर्न मॅन कर्णाचा अवतार, कंगना म्हणते हाॅलिवूडपट पुराणातूनच

रणवीर आहना

बँड बाजा बारात या सिनेमात रणवीर आणि अनुष्का शर्मा यांची केमिस्ट्री ऑनस्क्रिन जुळलीच पण अनुष्का त्याच वेळी रणवीरसाठी वेडी झाली होती. त्यांच्या अफेयरच्या चर्चाही रंगल्या होत्या. अनुष्काचं कौतुक करताना रणवीरचं तिच्यात गुंतलेलं अनेकांना दिसलं होतं. अनुष्काने कधी त्यांच्या नात्याविषयी जाहीरपणे सांगितलं नाही. पुढे रणवीर अनेक कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हासोबत दिसायला लागल्यावर अनुष्काने त्यांच्यापासून अंतर राखलं. आता अनुष्काने विराट कोहलीशी लग्न केलं आहे आणि तिला वामिका नावाची मुलगीही आहे.

रणवीर अनुष्का

लुटेरा या सिनेमात सोनाक्षी सिन्हासोबत ऑनस्क्रिन रोमान्स करता करता रणवीर सिंग तिच्या प्रेमात पडला होता. या सिनेमात रणवीरने सोनाक्षीची फसवणूक केली असं दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात सोनाक्षीने रणवीरसोबतचं नातं मध्येच तोडल्याचं बोललं जातंय. रणवीर आणि सोनाक्षी अनेक ठिकाणी एकत्र दिसायचे. पण त्यानंतर सोनाक्षीने काही असे फोटो आणि कॅप्शन शेअर केल्या की तिचा साखरपुडा ठरल्याचं जाणवत होतं. रणवीरशी ब्रेकअप झाला पण तिने अजून तिचा तो मिस्ट्री मॅन कोण हे सांगितेलं नाही.

शमिता शेट्टीसाठी राकेश बापटनं सोडलं पुणे,शेअर केले मुंबईच्या घराचे Photo

रणवीर सोनाक्षी

किल दिल या सिनेमात रणवीर सिंग आणि परिणीती चोप्रा ही जोडी एकत्र दिसली होती. शूटिंग संपलं, सिनेमा प्रदर्शित झाला तरी ते सोबत फिरताना दिसत होते. रणवीरला परिणीतीचा खट्याळपणा आवडला तर रणवीरच्या उत्साही प्रेमावर परिणीतीचा जीव जडला होता. एका मुलाखतीत परिणीती असं म्हणाली होती की तिला रणवीरसोबत चॉकलेटने भरलेल्या बाथटबमध्ये डुंबायचं आहे. तिच्या या वक्तव्याचीही खूप चर्चा झाली होती. पण या दोघांचं नातंही पुढे गेलं नाही.

रणवीर परिणीती

या अफेयर्सनंतर रणवीरच्या आयुष्यात दीपिका आली. तेव्हा रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्याने दीपिकाही डिप्रेशनमध्ये होती. ही जोडी प्रेमात पडली. रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या सिनेमात या दोघांची केमिस्ट्री भन्नाट जुळली. आता रणवीर सिंग दीपिकाशी लग्न करून खूश आहे. पण जेव्हा जुन्या आठवणी निघतात तेव्हा रणवीरच्या आयुष्यात त्या चौघींची नावं उजेडात येतातच.

शिंदेनी थांबवलं, तरी सलमानने रितेशच्या कानात विचारलं; शिवरायांना वंदन करण्यापूर्वी सलमानने मन जिंकलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here