पोलिसांनी सोमवारी झालेल्या हिसांचाराची चौकशी सुरु केली आहे. न्यायदंडाधिकारी कोर्टाकडे पोलिसांनी यासंदर्भातील विनंती केली होती. न्यायालयानं महिंदा राजपक्षे, नमल राजपक्षे, यांच्यासह राजपक्षे यांच्या पक्षाच्या 13 खासदारांवर परराष्ट्र प्रवासाला बंदी घातली आहे. यामध्ये जॉनस्टन फर्नांडो, सनथ निशांथा, पार्थिव वान्निराच्छी, सीबी रतनायके, संजीव इदिरीमाने यांना श्रीलंका सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
महिंदा राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानासमोर आणि गोतबाया राजपक्षे यांच्या सचिवालयासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हल्ला केल्याचा आरोप राजपक्षे समर्थकांवर आहे. महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत हिंसाचार उफाळला होता. राजपक्षे यांची ताकद दाखवून देण्यासाठी आंदोलकांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पद सोडण्यापूर्वी त्यांच्या ३ हजार समर्थकांसमोर भाषण केलं आणि त्यांना आंदोलकांवर हल्ला करण्यास प्रेरित केलं असं आरोप करण्यात आला आहे.
श्रीलंकेत कर्फ्यू लावल्यानंतर सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला. महिंदा राजपक्षे आता श्रीलंकेच्या नौदलाच्या तळावर आहेत. महिंदा राजपक्षे यांनी २००५ ते २०१५ या काळात तामिळ बंडखोर लिट्टे या संघटेनेविरुद्ध लष्करी कारवाई केली होती. गोतबाया राजपक्षे यांनी एक व्हिडीओ जारी करुन सोमवारी झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या खासदारांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.
संदर्भासहित कविता सादर करत भाजपला शरद पवारांचं प्रत्युत्तर