कोलंबो : भारताचा शेजारी देश श्रीलंका आर्थिक संकटात सापडाल होता. आर्थिक संकटाला सत्ताधारी राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्यासाठी ३१ मार्चपासून श्रीलंकेत आंदोलनाला सुरुवात झाली. अखेर सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेत निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्वपक्षीय सरकारच्या स्थापनेचं आश्वासन विरोधी पक्षांना दिलं होतं. सर्वपक्षीय सरकारचा नेता कोण होणार याबाबत गोतबाया राजपक्षे यांनी अनेकांशी चर्चा केली. मात्र, पंतप्रधानपदावर एकमत होत नव्हतं. अखेर गोतबाया राजपक्षे यांनी ज्येष्ठ नेते रानिल विक्रमसिंघे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली आणि त्यानंतर रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान होण्यास तयार झाले. गुरुवारी सायंकाळी रानिल विक्रमसिंघे यांनी पतंप्रधानपदाची शपथ घेतली.

ओवेसींची औरंगजेबाच्या कबरीला भेट, शिवसेना भडकली, चंद्रकांत खैरेंचा थेट वारिस पठाणांना फोन
रानिल विक्रमसिंघे यांचा २२५ सदस्यांच्या संसदेत केवळ एक खासदार आहे. रानिल विक्रमसिंघे यांनी यापूर्वी पाचवेळा पंतप्रधानपद भूषवलं आहे. गोतबाया राजपक्षे यांनी रानिल विक्रमसिंघे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान होण्यास तयारी दर्शवली आहे. रानिल विक्रमसिंघे यांचं सध्याचं वय ७३ वर्ष आहे. विक्रमसिंघे हे यूएनपी पार्टीचे प्रमुख आहेत. श्रीलंकेतील राजकीय स्थिती पाहिली असता श्रीलंका पीपल्स फ्रीडम अलायन्सकडे १४५ खासदारांचं संख्याबळ आहे. एसजेबी पक्षाकडे ५४ आणि तामिळ नॅशनल अलायन्सचे १० खासदार आहेत. इतर पक्षांच्या खासदारांची संख्या १६ आहे.
शरद पवार बडे दिलवाले, त्यांनी लगेच माफी मागितली असती: बृजभूषण सिंह
श्रीलंकेला पुन्हा उभं करण्याचं आव्हान
श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सध्या निर्माण झालेलं राजकीय संट आणि हिंसाचार आटोक्यात आणून देशाला पुन्हा उभं करण्याचं आव्हान रानिल विक्रमसिंघे यांच्यासमोर आहे.महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता रानिल विक्रमसिंघे यांना देशाचा कारभार पाहावा लागणार आहे.

गोतबाया राजपक्षेंना विरोध, १७ मे रोजी अविश्वास ठराव?
श्रीलंकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समगी जन बालावेगया एसजेबी पार्टीनं पंतप्रधान पद स्वीकराण्याची जबाबदारी घेतली होती. राष्ट्रपती राजपक्षे यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं. मात्र, राजपक्षे यांनी रानिल विक्रमसिंघे यांची निवड केली. दुसरीकडे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला जाणार आहे. १७ मे रोजी राष्ट्रपतींवर अविश्वास ठराव आणला जाईल.यासंदर्भात संसदेच्या सभागृहातील अध्यक्षांच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात येण्याला राष्ट्रपती राजपक्षे यांना देखील जबाबदार ठरवलं गेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here