प्रशांत महीपती पाटील (वय ४७ रा. राजारामपुरी ११वी गल्ली) याला बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरीच्या दागिन्यांपैकी २० लाख ६४ हजार रुपये किमतीचे ४४.३ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केले. टाकाळा परिसरातील माऊली विहार या इमारतीत रणजीत शांतीलाल पारेख यांचे रणजीत एंटरप्राइजेस हे सराफी दुकान आहे पहिल्या मजल्यावर शोरूम तर दुसर्या मजल्यावर ऑफिस आहे. रविवारी रात्री त्याने नेहमीप्रमाणे कुलूप लावून दुकान बंद केले सोमवारी सकाळी त्यांच्या दुकानाच्या शेअरचा कुलुप अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने उघडून २६ लाख रुपये किमतीचे ५६ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल…
दरम्यान, याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासासाठी विशेष पथक नेमले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुकानाचे कुलूप काढण्यासाठी बनावट चावीचा वापर तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे गायब केल्याने चोराला याबाबत माहिती असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी संबंधित यांची कसून चौकशी केली.
मालकाच्या मित्रानेच केली चोरी…
प्रशांत पाटील यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून दागिने तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली. सदरची कारवाई गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, हे. कॉ. ऋषिकेश पवार, युवराज पाटील, लखन पाटील, शुभम संकपाळ, सागर माने, राहुल कांबळे यांनी केली.