रत्नागिरी : तालुक्यात सोमेश्वर मडकेवाडी येथे एका तरुणाने काही कारणातून फणसाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. ही घटना बुधवार ११ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रुपेश गोविंद मडके (३५ रा.सोमेश्वर मडकेवाडी,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा पुतण्या दुर्गेश निलेश मडके (१९ रा.सोमेश्वर मडकेवाडी,रत्नागिरी) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर, बुधवारी रात्री रुपेश मडके यांच्या पत्नीने दुर्गेशला फोन करुन रुपेश मडके फणसाच्या झाडावर चढले होते. ते अजून खाली उतरले नसल्याची माहिती दिली.

ईडीचा धडाका सुरुच, माजी आमदाराचे १३३ कोटी जप्त
त्यानंतर दुर्गेशने घराच्या पाठीमागील बाजूस जाऊन पाहिले असता त्याला रुपेश मडके फणसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल सावंत करत आहेत.

Adv: स्वयंपाकाचे दिवस – कुकवेअर आणि उपकरणे मिळवा केवळ ५९९ रुपयांपासून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here