लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या अल्पसंख्यांक कल्याण विभागानं जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकारी यांनी लेखी आदेश दिले आहेत. या आदेशान्वये राज्यातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं सक्तीचं करण्यात आलं आहे. मार्च महिन्यात उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातील १६ हजार मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायन सक्तीचं केलं आहे. त्यामध्ये सरकारचं अनुदान मिळत असलेल्या ५६० मदरशांचा समावेश आहे.
बीड : भरचौकात गाडीने घेतला पेट, नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ…
रमझानचा महिना असल्यानं मदरसे बंद होते. त्यामुळं मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. मदरशांमधील शैक्षणिक कामकाज आजपासून सुरु झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदवी आणि पदव्यु्त्तर अभ्यासक्रमाच्या १.६२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा १४ मे पासून सुरु होत आहे. राष्ट्रगीताचं गायन हे बऱ्याच मदरशांमध्ये यापूर्वीपासून सुरु आहे. मात्र, आता राज्य सरकारच्या आदेशानं ते सक्तीचं करण्यात आलं आहे. सकाळी शैक्षणिक वर्ग सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीताचं गायन करण सक्तीचं करण्यात आलं आहे. मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं इफ्तिखार अहमद जावेद यांनी म्हटलं आहे. राज्य अल्पसंख्यांक कल्याण विभागाचे ते अध्यक्ष आहेत.
Sambhajiraje: संभाजीराजेंची खासदारकी भाजपच्याच हातात; केवळ आघाडीच्या मतांवर निवडून येणे अशक्य
मदरसा सुरु होताच निर्णयाची अंमलबजावणी करण्याची आदेश
रमजान आणि ईदच्या सुट्टीनंतर मदरशांमधील शिक्षण पुन्हा सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीनं राष्ट्रगीत म्हणण्याची सक्ती करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्यावतीनं अल्पसंख्याक कल्याण विभागानं हे पत्रक जारी केलं आहे. जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकारी यांच्यावर या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबादारी असेल.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं धार्मिक स्थळांवरील अवैध भोंगे उतरवण्यासंदर्भातील आदेश गेल्या महिन्यात जारी केले होते. राज्य सरकारच्या वतीनं भोंग्यासंदर्भातील आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांवरील अवैध भोंगे उतरवण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं त्याबद्दल कौतुक केलं होतं.

१२ वर्षात १३ हजार आरोपी, पण फक्त १३ गुन्हे सिद्ध; देशद्रोह गुंडाळण्याची ही आहेत कारणं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here