मुंबई : बॉलिवूडची उत्साही, खोडकर मुलगी आहे सारा अली खान. ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीनही भल्याभल्यांची फिरकी घेणारी सारा अली खान सध्या काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. काश्मीर हे तिचं आवडतं डेस्टिनेशन असल्याने उन्हाळी सुट्टीसाठी तिने काश्मीर सफरची निवड केली आहे.खरं तर साराने तिला हवा असलेला पदार्थ ऑर्डर करताच तिच्यासमोर हजर होऊ शकतो, पण काश्मीरमध्ये टेंटच्या बाहेर मस्त थंड वातावरणात साराने स्वत:च्या हाताने स्वादिष्ट भाजी बनवली.

अभिनयात तर तिची गाडी सुसाट धावत आहेच पण कुकिंगमध्येही सारा सुगरण असल्याची पावती तिच्या हातची भाजी खाणाऱ्यांनी दिली आहे. साराने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनीही भरभरून दाद दिली आहे. डिनर टाइम अशी कॅप्शन देत साराने स्वयंपाक करत असल्याचे फोटो शेअर केले आहेत. ट्रॅकसूट, दुपट्टा आणि इअरफोन घातलेला साराचा लुकही चाहत्यांना आवडला आहे.

सनी लिओनीचं ते वादग्रस्त ट्वीट पडलं होतं भारी, केकेआरनं केली होती पोलिसांत तक्रार

सारा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती घरातील इब्राहिम अली खानसोबतचे फनी व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या व्हिडिओला चाहते कमेंट करत असतात. काश्मीर ट्रीपमधले फोटो शेअर करत तिने चाहत्यांशी संवाद सुरू ठेवला आहे.

सारा अली खान

काश्मीरमधील पहलगाम शहरातील डोंगरदऱ्यात ट्रेकिंग करून परतल्यानंतर तिचा श्रमपरिहार सुरू आहे. या प्रवासात तिने काश्मीरमध्ये कँप फायरचा आनंद घेत भाजी बनवली. काश्मीरमधल्या फोटोसोबत तिने लिहिलेल्या, काश्मीर की कली, बॅक टू युअर गली, अब मै ट्रेकिंग के लिए चली या ओळीही लक्ष वेधून घेत आहेत.


अतरंगी रे या सिनेमात सारा यापूर्वी दिसली होती. आता ती विकी कौशलसोबत लवकरच एका सिनेमात दिसणार आहे. द खतरा खतरा या शोमध्येही तिने हजेरी लावली होती. गॅसलाइट हा तिचा सिनेमाही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात तिच्या हातात सिनेमांची जंत्री असल्याने सध्या ती काश्मीरमध्ये सुट्टी आणि कुकिंगचा आनंद घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here