मुंबई : घरचा मेन्यू असो किंवा कुठे बाहेर खाण्याचा प्लॅन असो, आपण सहज पनीर खातो. पण पनीरसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने बदलापूर आणि भिवंडीमध्ये दोन कथित बनावट पनीर उत्पादन कंपनीचा पर्दाफाश केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीतून २१३१ किलो उत्पादन जप्त करण्यात आलं असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे अनेक उपनगरं आणि दक्षिण मुंबईतील अनेक रेस्टॉरंट्स आणि भोजनालयांना वर्षभरापासून हे बनावट पनीर पुरवलं जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी ६ मे रोजी चेंबूरमध्ये एक टेम्पो ताब्यात घेतला आणि ६३१ किलो बनावट पनीर जप्त केलं होतं. त्यांनी पनीरचे नमुने घेतले त्या टेम्पोमधून ते चेंबूर येथील एका डेअरीत नेले जाणार होते.

मुंबई लोकलमध्ये एका महिन्यात किती प्रवाशांनी फुकट प्रवास केला? समोर आला आकडापोलिसांनी अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘जप्त केलेले नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडे (FDA ) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्या अहवालात ते बनावट होते, त्यात तेल होते आणि ते खाण्यायोग्य नव्हते, अशी माहिती समोर आली.’ या अहवालानंतर, FDA अधिकाऱ्याने बुधवारी चेंबूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) २७२ (विक्रीसाठी अन्न किंवा पेयामध्ये भेसळ) आणि २७३ (हानीकारक अन्न किंवा पेय विक्री) या अंतर्गत एफआयआर दाखल केला. यानंतर क्राइम ब्रँच कंट्रोल युनिटने यासंबंधी तपास हाती घेतला.

दोन कारखान्यांवर छापे

पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले की, ‘आम्ही या प्रकरणी सात आरोपींना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. ईओडब्ल्यू, मुंबईच्या गुन्हे शाखा नियंत्रण युनिटसह FDA ची मदत, अन्न भेसळी विरुद्ध प्रभावी खटले चालवले जातील’

पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बदलापूरमधील यशोदा ऑरगॅनिक फूड आणि भिवंडीतील दिशा डायरी या दोन कारखान्यांवर छापे टाकले आणि मालकांना अटक केली. या दोन्ही कारखान्यांमधून पामतेल, दूध पावडर आणि पनीरने भरलेले ९५ कंटेनर जप्त करण्यात आले आहे.’ दरम्यान, हे नकली पनीर २००-२५० रुपयांना विकले जात होते. ते तयार करण्यासाठी दुधाऐवजी दुधाची पावडर आणि पाम तेल वापरत होते. यामध्ये एका कारखान्यात दररोज सुमारे २००० किलो पनीर विकले जात होते. त्यामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होता.
दुधाच्या टँकरचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

पॅक केलेले पनीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here