मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र कोर्टाच्या आदेशामुळे दरेकर यांची तात्काळ जामिनावर सुटका होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर थोड्याच वेळात माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल होतील, अशी माहिती आहे. (Mumbai Bank Bogus Labor Case)
दरम्यान, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता.
‘विरोधकांचा हिशोब चुकता केला जाईल’; गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश नाईकांनी पहिली प्रतिक्रिया