बॉलिवूडची पिगी चॉप्स लग्न करून सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येच आहे. काही महिन्यांपूर्वी ती सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. मुलगी मालतीसोबत प्रियांका आणि निक वेळ घालवत आहेत. न्यूयॉर्कच्या भेटीत कतरिना आणि विकी यांनी प्रियांकाच्या सोना या न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटला भेट दिली. या रेस्टॉरंटमध्ये विकी आणि कतरिनाचं अगदी आपुलकीने स्वागत करण्यात आलं. प्रियांकाने खास लक्ष देऊन दोघांना रेस्टॉरंटमधील स्पेशल पदार्थ खाऊ घातले. खास आइस्क्रीमचाही त्यांनी आस्वाद घेतला. प्रियांकाचा पाहुणचार घेऊन विकी आणि कतरिना दोघंही तृप्त झाले.
सोनाली कुलकर्णीने केलं दुसऱ्यांदा लग्न, Photo आला समोर

प्रियांकाने सातासमुद्रापार रेस्टॉरंटमध्ये केलेल्या अगत्याचं कौतुक करताना कतरिना थकता थकेना झालीय. तिने तिच्या सोशल मीडियावर प्रियांकाला टॅग करत एक पोस्ट लिहिली आहे की, घरापासून लांब आल्यावर दुसरं घरं मिळालं. प्रियांका तू जे करतेस ती प्रत्येक गोष्ट कमाल असते. कतरिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर ही पोस्ट केली आहे. विकी कौशलनेही त्याच्या इन्स्टास्टोरीला प्रियांकाच्या रेस्टॉरंटमधील फोटो शेअर केला आहे.

कतरिना प्रेग्नंट असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून धडकत होत्या. पण या अफवा असल्याचं उघड झाले आहे. सध्या तरी थोडा ब्रेक पूर्ण झाल्यावर कतरिना आणि विकी त्यांच्या कामावर फोकस करणार आहेत. कतरिना लवकरच टायगर ३, फोन बूथ, मेरी ख्रिसमस या सिनेमात दिसणार आहे. तर गोविंदा नाम मेरा, द ग्रेड इंडियन फॅमिल यासह दोन सिनेमात विकी झळकणार आहे.
आई कुठे काय करते: आशुतोष जाणार कोमात, अरुंधतीचं समोर येणार नवं रूप

Excellent to the point article and news.. Well appreciated, My sites: okbet 2022