बंडू येवले | लोणावळा :

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ भीषण अपघात झाला आहे. लोखंडी कॉईलची वाहतूक करणाऱ्या ट्रेलर चालकाचे येथील तीव्र उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर पुढे जाणाऱ्या एका टेम्पोला धडकून महामार्गावर उलटला, तर टेम्पोही या धडकेत पलटला आहे. अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Mumbai Pune Express Highway Today News)

अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बोरघाट दस्तुरी महामार्गाचे पोलीस व खोपोली पोलिसांसह देवदूत आपत्कालीन पथक आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्त वाहने व मार्गावर पडलेल्या लोखंडी कॉईल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर सापडलेली ती वस्तू ‘बॉम्ब’ नव्हे, पोलीस आयुक्तांची माहिती

दरम्यान, एक्स्प्रेस वेवरील अपघातानंतर वाहतूक कोंडीमुळे वाहने जुन्या पुणे मुंबई मार्गावर वळवण्यात आली आहेत. महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ लागेल, असं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here