गडचिरोली : पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज १३ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील अरसोडा गावानजीक घडली. नलू बाबुराव जांगडे (वय ३५ रा.अरसोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

पती आजारी असल्याने ही महिला आज सकाळी उन्हाळी पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेली होती. मात्र, बांधाआड दडून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला. यात तीचा झाला. ही बातमी कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकरी घटनास्थळी पोहोचल्यावर वाघ त्याच परिसरात होता. गावकऱ्यांनी आरडाओरड करून वाघाला पळवून लावले. संबंधित महिला मृतदेह हा शेतातच होता. या घटनेची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मागील काही दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष सुरू असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. वन्यजीवांच्या भीतीचे सावट असतानाही पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो कामगार तेंदूपत्ते गोळा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here