मुंबई : साउथ फिल्म इंडस्ट्री सध्या चांगलीच फॉर्मात आहे. पुष्पा, आरआरआर, केजीएफ, बीस्ट या दाक्षिणात्य सिनेमांनी टॉलिवूडमध्येच नव्हे तर जगभरात कमाईचा धुमाकूळ घातला आहे. आता सिनेमा इंडस्ट्रीला कोणतीच प्रांतिक बॉर्डर राहिलेली नाही. बॉलिवूडचे अनेक कलाकार साउथच्या सिनेमात झळकतात तर साउथचे कलाकारही हिंदी सिनेमात दिसतात. त्यामुळेच कलाकारांनी आता बॉलिवूड हॉलिवूड आणि टॉलिवूड यांच्यातील सीमा ओलांडल्या आहेत. यावरूनच साउथ सुपरस्टार महेश बाबूला बॉलिवूड पदार्पणाबाबत विचारलं आणि त्याने दिलेल्या उत्तराने वातावरण चांगलच ढवळून निघालं.

महेशबाबू शाहरुख

बॉलिवूडमध्ये कधी येणार या प्रश्नावर बोलताना महेश बाबू म्हणाला की बॉलिवूडला मी परवडणार नाही. माझं मानधन देण्याची बॉलिवूडची आर्थिक ताकद नाही. महेश बाबूने केलेल्या या वक्तव्यावरून चर्चा रंगत आहेत. काही बॉलिवूड कलाकारांनी महेश बाबूच्या या मताचा आदर केला आहे तर काही कलाकारांनी विरोधाचं शस्त्र उपसलं आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी महेश बाबूच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. कंगना रणौतनेही महेश बाबूला पाठिंबा दिला. सुनील शेट्टीने मात्र तुझा चष्मा बदल म्हणत महेश बाबूवर ताशेरे ओढले. एकूणच काय तर महेश बाबू आणि बॉलिवूड प्रकरणात अनेक कलाकार त्यांचं मत व्यक्त करत आहेत.

सलमान भावाचा संसार मोडला, २४ वर्षांनी विभक्त होणार सोहेल- सीमा

महेशबाबू

याच वातावरणात सध्या किंग खान शाहरूख खानचा एक जुना व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. एका मुलाखतीचा हा व्हिडिओ असून यामध्ये शाहरूख खान काहीही झालं तरी हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडणार नाही असं सांगताना दिसत आहे.या मुलाखतीत शाहरूखला असं विचारलं की, बॉलिवूडचा सुपरस्टार आहेसच पण हॉलिवूडची ऑफर आली तर घेशील का?

त्यावर शाहरूख म्हणतोय की, मला उंची नाही. मला इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे मला काहीही न बोलणाऱ्या व्यक्तीचा रोल द्यावा लागेल. हॉलिवूडच्या हिरोला लागणारी पर्सनॅलिटी माझ्याकडे नाही. मी हॉलिवूडसाठी योग्य नाही त्यामुळे मला तिथे काहीच स्थान नाही. मला सालसा डान्स येत नाही. अर्थातच त्याच्या चाहत्यांनी किंग खानच्या या उत्तराचं सोशल मीडियावर तोंड भरून कौतुक केलं आहे. म्हणून तू किंग आहेस असं म्हणत त्याच्यावर कमेंट येत आहेत.

झाकीर हुसेन यांनी सोडली नाही पंडित शिवकुमार शर्मांची साथ

शाहरूख खान अजूनही लाखो तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे. लवकरच तो टायगर ३, रॉकी ओर रानी की प्रेमकहानी या सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या या किंग खानने बॉलिवूडसाठी हॉलिवूड सोडणार नाही म्हणत चाहत्यांच्या मनातील स्थान घट्ट केलं आहे. महेश बाबूच्या वक्तव्याने तापलेल्या वातावरणात शाहरुखच्या या जुन्या व्हिडिओला हजारो लाइक्स मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here