जोआमध्ये करोनाची लक्षणं दिसल्यानंतर तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर करीम यांनाही करोनाची लागण झाली. जोआची नुकतीच केलेली करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानं डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला आहे. जोआ सोबतच तिची बहीण शाझा हिला देखील डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आहे.
जोआनं इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिनं उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत. ‘आपले सर्व डॉक्टर्स खरंच खूप मोठं काम करत असून या योद्धांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. गुडबाय आयसोलेशन आयसीयू. असं जोआनं म्हटलं आहे.
दरम्यान, ज्या इमारतीत करीम मोरानी यांचं कुटुंब राहत आहे ती इमारत सील करण्यात आली आहे. यामुळे इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्या परिसरात अनेक सेलिब्रिटी राहतात.
अनेक वेब सीरिजमध्ये केलंय काम
शाहरुख खानने २०११ मध्ये जोआ मोरानीला ऑल्वेज कभी कभीमधून सिनेसृष्टीत लॉन्च केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत अली फजल आणि सत्यजीत दूबे होते. याशिवाय तिने मस्तान, भाग जॉनी भाग, अखूरी अशा वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. जोआ मोरानीने ओम शांति ओम आणि हल्ला बोल या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times