पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन…
यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेत शहरातील प्रभाग क्रमांक तीन येथील नगरसेविका नाझिया नासीर पठाण यांनी धुळे शहरातील नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून महानगर पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले आहे.
पालिका प्रशासन या संदर्भात गंभीर नसल्यामुळे लोकप्रतिनिधी आक्रमक…
या आंदोलनादरम्यान प्रभागातील महिलांनी देखील नगरसेविका नाझीया नासीर पठाण यांच्यासह पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा ४४ अंश पेक्षा देखील पुढे जात असल्यामुळे एकीकडे उन्हाच्या झळा सहन करत असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण करावी लागत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधीकडून धुळे महानगरपालिका प्रशासनाला या संदर्भात वारंवार निवेदन देण्यात येत आहेत. परंतु पालिका प्रशासन या संदर्भात गंभीर नसल्यामुळे लोकप्रतिनिधींनी आक्रमक होत आज हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
यानंतर, तरी धुळे महानगर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर पाणीपुरवठ्यावर नियोजन करेल अशी आशा आंदोलनकर्त्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.