मुंबई : बाॅलिवूडमध्ये मागच्या काही काळात बरेच घटस्फोट झाले. अनेक नाती तुटली. घरं विखुरली गेली. आता या यादीत सलमानचा भाऊ सोहेल खान आणि त्याची बायको सीमा खान हेही आलेत. लग्नाच्या २४ वर्षानंतर दोघं घटस्फोट घेत आहेत. काही वर्षांपूर्वी सोहेलचा भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचाही घटस्फोट झाला होता. खान कुटुंबासाठी हा मोठा आघात आहे. सलमाननं हे नातं टिकावं म्हणून खूप प्रयत्न केले होते. पण काही उपयोग झाला नाही.

अनेक वर्षी सोहेल-सीमा वेगवेगळे रहात होते
सीमा खान आपल्या पतीपासून अनेक वर्ष वेगळीच रहात होती. The Fabulous Lives of Bollywood Wives मध्ये सीमानं सांगितलं होतं की ती सोहेलसोबत रहात नाही. तिचं सोहेलशी झालेलं लग्नपारंपरिक नाही. पण तो एक कुटुंब आहे आणि चांगला बाप आहे. असं म्हणतात, सलमान खाननं आपल्या भावाचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तो सोहेलला समजावायला घरीही गेला होता. दोघांची चर्चाही झाली होती.

सलमान भावाचा संसार मोडला, २४ वर्षांनी विभक्त होणार सोहेल- सीमा

सलमाननं लग्न वाचवण्याचा केला होता प्रयत्न
सलमान खाननं २०१६ मध्ये सोहेल आणि सीमा खान यांचं लग्न तुटू नये यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण काही उपयोग झाला नाही. दोघांनी फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सलमानसाठी कुटुंबच सर्व काही आहे. पण त्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.

हुमा कुरेशीबरोबर जोडलं होतं सोहेल खानचं नाव
सोहेल आणि हुमा कुरेशी यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली, तेव्हाच सीमा घर सोडून निघून गेली होती. हुमा आणि सोहेलची भेट सेलिब्रिटी क्रिकेटमध्ये झाली. हुमा सोहेलच्या क्रिकेट टीमची ब्रँड अँबेसिडर होती. तेव्हापासून दोघांचं नाव जोडलं गेलं.

हुमा कुरेशी

१९९८ मध्ये प्रेमविवाह केला होता
सोहेल आणि सीमा यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. सीमा ही मुळची दिल्लीची आहे. फॅशन जगतात नाव कमवण्यासाठी ती मुंबईत आली होती. रिपोर्टनुसार, दोघांची पहिली भेट चंकी पांडेच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये झाली होती. सोहेल पहिल्या नजरेतच सीमाच्या प्रेमात पडला होता. यानंतर दोघांचं प्रेम घट्ट झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडणार नाही, महेशबाबू वादानंतर शाहरुखचा जुना Video Viral

मध्यरात्री केलं लग्न
धर्म वेगवेगळे असल्यामुळे सोहेल आणि सीमा यांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. यामुळे मध्यरात्री मौलवीला बोलावण्यात आले आणि रात्रीच त्यांनी निकाह केला होता. त्यानंतर दोघांनी आर्य समाज मंदिरात दुसरं लग्न केलं. सीमाच्या आईवडिलांचा लग्नाला विरोध होता.

घर सोडून सीमा पनवेलला रहात होती
सोहेलचं घर सोडल्यानंतर सीमा पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये रहात होती, असं तिनं सांगितलं होतं. तिथे तिचे सासू-सासरेही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here