हिंगोली : अवकाळी पाऊस आणि वातारणातील बदलामुळे डाळिंब बागांचे नुकसान झालेच आहे. शिवाय यावर कोणताच पर्याय शेतकऱ्यांना काढता आला नाही. आता वाढत्या उन्हामुळे डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. किमान आगामी उत्पादनावर याचा परिणाम होऊ नये म्हणून हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील शेतकऱ्याने असे काय जुगाड लावले आहे की पंचक्रोशीत त्याची चर्चा होऊ लागली आहे.

डाळिंब उत्पादक राजू पाटील यांनी २ एकरातील तब्बल ६०० डाळिंबाच्या फळाना क्रॉप कव्हरचे अच्छादन केले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून वाढलेल्या उन्हामुळे ही वेळ डाळिंब उत्पादकांवर आली आहे. शिवाय पाणी पातळीतही घसरण झाल्याने बागा जोपासणे जिकिरीचे झाले आहे.

शेतकऱ्याचे १० हजारात जुगाड

वाढत्या उष्णतेचा पिकांना मोठा फटका बसत आहे. डाळींब पिक धोक्यात आले आहे. मात्र, माळसेलू येथील डाळींब उत्पादक राजू पाटील यांनी नामी शक्कल लढवित चक्क डाळींब पिकांना क्रॉप कव्हरवचे अच्छादन केले. त्यासाठी त्यांना अवघे १० हजार रुपये खर्च आला. कमी खर्चात त्यांच्या डाळींब बागाचे उन्हापासून संरक्षण होणार आहे.

Photos : मांजर समजून बिबट्याचा बछडा आणला घरी, चिमुकलीच्या पराक्रमाने सगळेच धास्तावले

वाढत्या उन्हाचा धोका काय…?
सध्या राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासह फळ पिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. डाळिंबाचा हंगाम संपला असून छाटणी कामे पूर्ण झाली आहेत. अशा अवस्थेत पाणी पुरवठा वेळेत झाला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. पण सध्याच्या वाढत्या उन्हामुळे बागा सुकू लागल्या आहेत तर दुसरीकडे पाणीपातळी ही झपाट्याने खलावत आहे. त्यामुळे संरक्षणासाठी निकम यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

समुद्रात वाहून आलेल्या सोन्याच्या रथाचे अखेर रहस्य उलगडले, वाचून व्हाल थक्क

इतर शेतकऱ्यांनाही फायदा

कमी क्षेत्रात फळबागांचे उत्पादन घेतले तर त्याचे नियोजन करता येते हे पाटील यांच्या या प्रयोगातून समोर आले आहे. शिवाय हे कमी क्षेत्र असल्यानेच शक्य झाल्याचे निकम यांनी सांगितले आहे. आता त्यांच्या या कल्पनेचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही होत आहे. डाळिंब बागांचे संरक्षण करण्यासाठी इतर शेतकरीही हाच पर्याय निवडत आहेत. कमी खर्चात किमान मे महिन्यातील उन्हाच्या झळापासून संरक्षण होईल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

वहिनी विधवा राहू नये म्हणून दिराने घेतला पुरोगामी निर्णय; विवाहाचे कौतुक देशभरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here