मुंबई : खान फॅमिलीतील सोहेल खान आणि सीमा सचदेव खान यांचा २४ वर्षांचा संसार अखेर संपुष्टात आला. बॉलिवूडमधल्या अजून एक जोडप्याच्या वाटा वेगळ्या झाल्याची बातमी धडकली. बॉलिवूडमधील खान फॅमिलीतील सलीम खानचा मुलगा, सलमान आणि अरबाज खानचा भाऊ सोहेल आणि त्याची बायको सीमा यांनी वेगळं होण्याच्या निर्णयावर कोर्टाचं शिक्कामोर्तब झालं. दोघांनीही त्यांच्यातील मतभेदांमुळे घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पण त्यांच्यात नेमकं काय बिनसलं याचं कारण अजून तरी गुलदस्त्यातच आहे. २४ वर्षापूर्वी दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं, पण आता त्यांनी त्यांच्यातील नातं संपवायचं ठरवलं.

सीमा खान सोहेल

खान फॅमिलीमध्ये काय सुरू आहे याकडे त्यांच्या चाहत्यांचे डोळे आणि कान लागलेले असतात. सोहेल खान हा बॉलिवूडमधील फारसा यशस्वी अभिनेता नसला तरी त्याच्या नावामागे असलेल्या खान या नावाच्या टॅगमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. सोहेल आणि सीमा यांच्यातील खटके गेल्या पाच वर्षापासूनच ऐकू येत होते. तेव्हापासूनच सीमा सोहेलपासून वेगळी बांद्राच्या फ्लॅटमध्ये राहत होती. सोहेल आणि सीमाला दोन मुलं आहेत. सीमा आणि सोहेल एकत्र राहत नव्हते. त्यानंतरच त्यांनी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली होती.

सहा वर्षांपासून सोहेल- सीमामध्ये होते वाद? भावाचा संसार टिकवण्याचा सलमानने खूप केला प्रयत्न


एखाद्या सिनेमाच्या पडद्यावर शोभेल अशी सोहेल आणि सीमाची लव्हस्टोरी आहे. आज सोहेल आणि सीमा एकमेकांसोबत रहायला तयार नाहीत पण २४ वर्षापूर्वी चित्र खूप वेगळं होतं. तेव्हा ही जोडी एकमेकांशिवाय राहू शकत नव्हती. फॅशन डिझायनर बनण्यासाठी सीमा सचदेव ही दिल्लीहून मुंबईला आली होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनर असलेली सीमा अभिनेता चंकी पांडे याची नातेवाईक आहे. चंकी पांडे याच्या साखरपुड्याच्या पार्टीत सोहेल आणि सीमा यांची ओळख झाली. मैत्रीतून प्रेम फुललं. सोहेल हा मुस्लीम तर सीमा हिंदू. याच कारणामुळे सीमाच्या कुटुंबीयांकडून सोहेलशी लग्नाला खूप विरोध होता.सीमाचं सोहेलला भेटणं बंद केलं होतं.

सोहेल खान सीमा

सीमा आणि सोहेलला त्यांच्या प्रेमापुढे धर्म, घरच्यांचा विरोध यांची काहीच फिकीर नव्हती. घरातून पळून जात त्यांनी लग्न करायचं ठरवलं. सोहेल सीमाला पळवून घरी घेऊन आला. तेव्हा वडील सलीम खान यांनाही सुरुवातीला धक्का बसला. पण त्यांनी विरोध केला नाही. म्हणाले, सीमा या घरात राहील पण त्यासाठी निकाह करावा लागेल. त्यासाठी मध्यरात्री साडेतीन वाजता मौलवींचं अपहरण करून सोहेल आणि सीमाने निकाह केला होता. निकाहानंतर हिंदू रिवाजाप्रमाणेही दोघांचं लग्न झालं. त्यांना निर्वाण आणि योहान अशी दोन मुलं आहेत.

सलमान भावाचा संसार मोडला, २४ वर्षांनी विभक्त होणार सोहेल- सीमा

सोहेल खान कुटुंबासोबत

प्रेमाच्या इतक्या परीक्षा दिल्यानंतर, सीमाच्या घरच्यांचा विरोध न जुमानता सोहेल आणि सीमा यांनी लग्न केलं. २० वर्ष एकत्र राहिले. मग असं काय कारण झालं की त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असा प्रश्न दोघांच्याही चाहत्यांना पडला आहे. पण अजून अधिकृत कारण समोर आलेलं नाही. असं बोललं जात आहे की, सोहेल गेल्या काही वर्षापासून हुमा कुरेशीसोबत डेट करत आहे. पण अजूनही यातील तथ्य माहिती नाही. पाच वर्षापासून सीमा सोहेलपासून वेगळी राहत आहे.

धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर दिमाखात लॉंच; उपस्थितांनी दिला आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here