मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएल २०२२च्या ६०व्या सामन्यात शुक्रवारी १३ मे पंजाब किंग्सविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने बेंगळुरूला ५४ धावांनी पराभूत केले आणि सामना आपल्या खिशात घातला. हा पंजाबचा हंगामातील सहावा विजय होता. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत मोठी झेप घेतली. पंजाबच्या या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी मोठे योगदान दिले.
Home Maharashtra ipl 2022: फलंदाजांनी धुतलं, गोलंदाजांनी रोखलं! बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवत पंजाबची गुणतालिकेत मोठी...