जळगाव : देशात दलितांचा धाक राहिला नाही. लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत ते हलविण्याची हिंमत केंद्र सरकार करत आहे. मात्र, या विरोधात बोलण्यासाठी एकही नेता पुढे येत नाही. ज्यांनी बोलायला पाहिजे ते मात्र मोदींचे दास झाले आहे असे म्हणत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले व नेते प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा अध्यक्ष प्रवीण सुरवाडे यांच्यातर्फे भुसावळ शहरात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री नितीन राऊत यांनी यावेळी भीम गीतांचा मनमुराद आनंद लुटला.

शरद पवारांवरील ‘ती’ पोस्ट भोवणार; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून केंद्र सरकारवर मंत्री नितीन राऊत यांनी निशाना साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत. ते हलवण्याचे काम सध्या केंद्र सरकारकडून सुरू आहे. मात्र, एकही नेता यावर बोलण्यासाठी पुढे येत नाही. दलितांकडेही तसेच आंबेडकरी समाज याकडेही दुर्लक्ष होत आहे. स्वतःला आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधी समजणारे मोदींचे दास झाले आहेत. नावात राम आहे मात्र कार्यातून ते दास असल्याचे म्हणत प्रत्यक्ष नाव न घेता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे नावात प्रकाश आहे पण ऊर्जा त्यांना आंबेडकरांकडून मिळाली, असे म्हणत नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांच्यावरही मंत्री राऊत यांनी टिकास्त्र सोडले.

मुख्यमंत्र्यांची आजची सभा वादळी ठरणार?; संजय राऊतांनी दिले स्पष्ट संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here