पुणे : भटक्या श्वानांसोबत मुलाला कोंडून ठेवणाऱ्या आईला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शाळेत भांडण केल्यानंतर मुलाने इतर मुलांच्या अंगावर धावून त्यांचा चावा घेतल्यामुळे मुलाला त्याच्या आई-वडिलांनी दोन वर्षे घरात श्वानांसोबत कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ‘चाइल्ड लाइन’ स्वयंसेवी संस्थेला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने मुलाची सुटका केली होती. मुलाला बालगृहात पाठविण्यात आले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याची तब्येत ठीक असून, त्याला कोणताही त्रास नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. महिलेने केलेल्या जामीन अर्जावर १७ मे रोजी सुनावणी होणार आहे.
आर्थिक फायद्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील दिलीप व्ही. गायकवाड यांनी केली. कल्पेश बोहरा (वय ४२, रा. बुलडाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
खंडणीविरोधी पथकाचे पोलीस फौजदार मधुकर तुपसौंदर (५१) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बोहरा मालमत्ता विक्रीसंबंधीचा मध्यस्थ असून, त्याने निवडणूक आयोगाचे बनावट ओळखपत्र सादर करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा, सुट्टीमुळे बाहेर पडलेल्या पर्यटकांची कोंडी