मुंबई : काही मोजके सिनेमे केलेला अभिनेता सोहेल खान आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर सीमा खान यांनी परस्पर सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २४ वर्षाच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देत घटस्फोट घेतला. सोहेल आणि सीमा यांनी २४ वर्षापूर्वी घरातून पळून जात आंतरधर्मीय विवाह केला होता. मात्र आता त्यांच्यातील नवराबायकोचं नातं संपलं आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते या दोघांच्या खाजगी गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

सोहेल सीमा

सोहेल खानच्या बाबतीत सांगायचं तर सोहेल हा फक्त अभिनेता नाही तर त्याचे अनेक व्यवसाय आहेत. हॅलो ब्रदर, प्यार किया तो डरना क्या या सिनेमाचं दिग्दर्शन सोहेलने केलं आहे. काही रिअॅलिटी शोच्या जजची भूमिकाही त्याने निभावली आहे. सोहेल एक निर्माता म्हणूनही काम करतो. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून काम करणाऱ्या सोहेलच्या खात्यात १९० कोटी रुपये आहेत.

का होतोय सीमा-सोहेल खानचा घटस्फोट? मध्यरात्री मौलवीचं अपहरण करून केलेलं

सोहेल सीमा

पूर्वाश्रमीची सीमा सचदेव ही खान कुटुंबाची सून यापलिकडे ती एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. सीमाची संपत्ती दीड मिलियन डॉलर असल्याचं समोर आलं आहे. सीमाचा स्वत:चा सीमा खान स्टोअर नावाचा डिझायनर ब्रँड आहे. बांद्रातील फॅशन लाइनची ती सीइओ आहे जी सुझान खान आणि महिप कपूर यांच्यासोबत सीमा चालवते. तसंच कलिस्टा नावाच्या एका ब्युटी स्पा व सलोनची ती मालकीण आहे. बॉलिवूडमध्ये ज्या श्रीमंत पत्नी आहेत त्यामध्ये सीमाचं नाव आहे.

म्हणून बिग बींनी डिलीट केलं कंगनाच्या ‘धाकड’चं गाणं, ब्लाॅगमध्ये सांगितलं कारण


कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता घरातून पळून जाऊन सोहेल आणि सीमाने निकाह केला. त्यानंतर हिंदू रिवाजानेही त्यांनी लग्न केलं. पाच वर्षापासून सोहेल आणि सीमा यांच्यात मतभेद वाढल्याने सीमा बांद्रातील फ्लॅटवर सोहेलपासून वेगळी राहत आहे. सोहेलचा भाऊ सलमान खान याने या दोघांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जातंय. सोहेल आणि सीमा यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. खान कुटुंबातील तीन मुलांपैकी अरबाजनेही पत्नी मलायकापासून घटस्फोट घेतला आहे. तर आता सोहेल आणि सीमाचाही घटस्फोट झाला आहे.

अमीर खानच्या घरातून बाहेर पडताना दिसली जेनेलिया देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here