मुंबई- मराठी सिनेसृष्टीतली कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून केतकी चितळेचं नाव घेतलं तर चुकीचं ठरणार नाही. अनेकदा ती राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर सोशल मीडियावरुन तिचं मत मांडत असते. त्यामुळं अनेकदा ती सोशल मीडियावर ट्रोलही होत असते. आता केतकीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे. आज आपण तिने आतापर्यंत केलेल्या वादग्रस्त विधानांवर एक नजर मारू.

‘केतकीचे मानसिक संतुलन बिघडले; ५-६ फटके दिल्यांनतर अक्कल येईल’

केतकीने १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिनं अनेक धर्मांचा उल्लेख केला आहे. केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क’, आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.’ नवबौद्धांसंदर्भातल्या वक्तव्यावर तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच ॲट्रॉसिटी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

केतकी चितळे

केतकी चितळेनं फेसबुक पोस्ट करत शिवप्रेमींवर टीका केली होती. फेसबुकवर पोस्ट करत केतकीने लिहिले होते की, ‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात.’

केतकी चितळे

‘बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका.

शरद पवारांवरील ‘ती’ पोस्ट भोवणार; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here