मुंबई: पालिकेचे कर्मचारी डोअर-टू-डोअर जाऊन लोकांची स्क्रीनिंग करण्यास सक्षम नसल्याने वन रुपी क्लिनिकच्या टीमने मुंबई महापालिकेकडे क्लिनिक सुरू करण्याचा आणि संशयितांची स्क्रीनिंग करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने हा प्रस्ताव धूळखात पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना हा धक्कादायक आरोप केला आहे. पालिकेकडे स्क्रीनिंग करण्यासाठी डोअर टू डोअर जाण्याकरिता पुरेसं मनुष्यबळ नसल्याचं आम्ही जाणून आहोत. त्यामुळे आम्ही क्लिनिक सुरू करण्याचा आणि स्क्रीनिंग करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना दिला होता. पण आमचा प्रस्ताव आयुक्तांकडे अजूनही धूळखात पडलेला आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी त्यावर अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यांना अनेकदा मेसेज केले. फोनही केले. पण ते फोनही उचलत नाहीत आणि मेसेजला रिप्लायही देत नसल्याचा आरोप घुले यांनी केला आहे.

डॉक्टरांचं पथक एका आठवड्यात ५ प्रतिव्यक्तीनुसार दहा लाख लोकांची स्क्रीनिंग करेल. मात्र आमच्या या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर असहमती दर्शविण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, करोना संशयितांची स्क्रीनिंग करण्यासाठी ५० पॅरामेडिकल आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांना फिल्डवर तैनात करण्यात आले असल्याचंही घुले यांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here