मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सून भारतात १० दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांनी नैऋत्य मोसमी पावसाची (SW Monsoon) दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात आगमनाची शक्यता असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

इतंकच नाहीतर, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. २७ मेपर्यंत मान्सून भारतीय किनारपट्टीवर पोहोचेल आणि पहिला पाऊस केरळमध्ये पडेल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. तर केरळच्या किनार्‍याजवळ अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे बहुस्तरीय मध्यम ढग दाटले आहेत. तर गोवा, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांवरही ढगांची चादर पाहायला मिळत आहे.

समुद्रात वाहून आलेल्या सोन्याच्या रथाचे अखेर रहस्य उलगडले, वाचून व्हाल थक्क

आनंदाची बामती

हिंद महासागरातून भारतात येणारे नैऋत्य वारे, ज्याला मान्सून म्हणतात. हे वारे वाहत भारतात पाऊस घेऊन येतात. भारताच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

खरंतर, १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. पण यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन सामान्य तारखेच्या काही दिवस आधी होण्याची शक्यता आहे. यावर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन २७ मे रोजी ± ४ दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह होण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या १२२ वर्षांती उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मान्सूनचे लवकर आगमन होणे, हा मोठा दिलासा ठरेल.

‘बाळासाहेबांचा मुलगा CM, शिष्य कॅबिनेट मंत्री; पण दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here