आगरताळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव ( Tripura CM Biplab Kumar Deb) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी भेट घेतल्यानंतर आज विप्लव देव यांनी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. पुढील वर्षी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका होणार असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुन्हा एकदा नवा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विप्लव कुमार देव यांच्याविषयी पक्षसंघटनेत असलेल्या नाराजीमुळे देव यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्यात आले, असं बोललं जात आहे. २०१८ मध्ये भाजपने त्रिपुरामध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर विप्लव देव यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. देव यांनी केलेल्या काही वक्तव्यावरूनही मोठा वाद झाला होता. तसंच पक्षातील अनेक नेतेही त्यांच्यावर नाराज होते. या नाराजीचा फटका भाजपला २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यामुळे हायकमांडने देव यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती आहे.

मोठी बातमी: केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात; शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली, सूत्रांची माहिती

राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले विप्लव देव?

पक्षनेतृत्वाने अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर विप्लव कुमार देव हे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र देव यांनी आपण यापुढे पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here