पारादीप फॉस्फेटस
पारादीप फॉस्फेटस लिमिटेड कंपनीचा आयपीओ १७ मे रोजी येणार आहे. हा आयपीओ १५०१ कोटी रुपयांचा असले. यासाठी कंपनीनं प्राईस बँड ३९ ते ४२ रुपयांदरम्यान निश्चित केला आहे. या आयपीओद्वारे केंद्र सरकार या कंपनीतील त्यांची १९.५५ टक्के हिस्सेदारी विकणार आहे. हा आयपीओ १९ मे रोजी बंद होणार आहे. या आयपीओद्वारे १००४ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जातील. प्रमोटर्स आणि इतर शेअरधारक ११.८५ कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी आणतील.
एथोस आयपीओ
महागड्या घड्याळांची निर्मिती करणारी कंपनी एथोसचा आयपीओ १८ मे रोजी येणार आहे. या आयपीओची साईज ४७२ कोटी रुपये आहे. या आयपीओची प्राईस बँड ८३६ ते ८७८ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. हा आयपीओ २० मे रोजी बंद होणार आहे. या आयपीओतून ३७५ कोटी रुपयांची उभारणी करण्याचं उद्दिष्ठ निश्चित करण्यात आलं आहे. याशिवाय ११ लाख ८ हजार ३७ इक्विटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. या आयपीओतून मिळणाऱ्या रकमेचा वापर कर्जाची परतफेड आणि इतर कारणांसाठी करण्यात येणार आहे.
ईमुद्रा आयपीओ
हा आयपीओ २० मे रोजी खुला होईल. या आयपीओवर २४ मे पर्यंत बोली लावणली जाणार आहे. सार्वजनिक गुंतवणूकीद्वारे ४७२ कोटी रुपयांची उभारणी करण्याचं उद्दिष्ठ ठेवण्यात आलं आहे. या आयपीओची प्राइस बँड २४३ ते २५६ रुपये प्रति इक्विटी शेअर इतकी ठेवण्यात आली आहे. ई मुद्रा हा आय़पीओ बंगळुरु येथील कंपनीचा आहे. सध्याचे कंपनीचे शेअर्सधारक आणि प्रमोटर्स ९८.३५ लाख शेअर्सची विक्री करणार आहेत.
चंद्राचं मुखदर्शन व्हावं तसं मुख्यमंत्र्यांचं आज जनतेला दर्शन होतंय | सदाभाऊ खोत