तसेच प्रसारमाध्यमांनी या सगळ्या गोष्टींना फार महत्व देऊ नये, असे अजित पवार यांनी सांगितले. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीका केली. महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींनी येऊन जनतेला आवडणार नाही, अशी कृती करु नये. महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करु नका, असे अजित पवार यांनी सांगितले. या सर्व गोष्टी ३०० वर्षांपूर्वी घडून गेल्या आहेत. आज आपल्यासमोर बेरोजगारी, महागाई आणि इंधन दरवाढ यासारखे प्रश्न आहेत, असेही अजित पवार यांनी म्हटले.
केतकी चितळेंवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार यांनी या सर्व प्रकरणावर फार बोलणे टाळले. मला काहीही ठाऊक नाही. कोणत्या व्यक्तीने टीका केली आणि ती व्यक्ती काय बोलली, हे मला माहिती नाही. संबंधित व्यक्ती नेमकं काय बोलली, हे जाणून घेतल्याशिवाय मी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटायला हव्या | छगन भुजबळ