मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस यांनी यावेळी अभिनेत्री केतकी चितळे हिची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलच्या फेसबुक पोस्टवर भाष्य केलं. ज्येष्ठ नेत्याबद्दल आपण काय बोलतोय याचं भान असलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ट्विटर हँडलवर शरद पवारांचा काटछाट केलेला व्हिडीओ पोस्ट केला नसल्याचं फडणवीस म्हणाले.

काय भाषा वापरतो याचं भान हवं
खर तर असं आहे की कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल आपण काय भाषा वापरतोय याचं भान असलं पाहिजे. खर तर सोशल मीडियावर खालच्या भाषेत बोललं जातं आहे हे चुकीचं आहे. यामध्ये कायदा त्याचं काम करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या ट्विटर हँडलवर कोणतीही काटछाट केलेली नाही. मीडियात असलेला व्हिडीओ आमच्या हँडलवर आहे, त्यामुळं त्यात कोणतीही काटछाट करण्यात आलेली नाही.
मोठी बातमी: केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात, अटक होणार?
छत्रपती संभाजीराजे आमचं अराध्य दैवत आहे. संभाजीराजे यांचा अनन्वित छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाईल तर तो केवळ हिंदूंचा नाही तर मुस्लिमांचा अपमान आहे. औरंगजेबाच्या कबरीवर जाणं हा देशभक्तांचा अपमान असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवार केतकी चितळे च्या पोस्टवर काय म्हणाले?
विरोधी पक्ष असो किंवा कुणीचं अशा प्रकारची वक्तव्य करु नये. मी अशा वक्तव्यांचा निषेध करतो. तुम्ही अशा गोष्टींना महत्त्व देऊ नका. चांगल्या गोष्टी दाखवा, आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींनी येऊन जनतेला आवडणार नाही, अशी कृती करु नये. महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करु नका, असं अजित पवार म्हणाले.

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पाहणार आहे, तुम्हीही दाखवणार आहात. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन आपण पुढं जाणार आहोत. कुणी साद घालावी हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला दुसऱ्या चॅनेलं साद घातली तर तुम्ही जाणार का असा सवाल अजित पवार यांनी पत्रकारांना केला.
मुख्यमंत्र्यांनी अचानक दिला राजीनामा; त्रिपुरामध्ये भाजपकडून पुन्हा आश्चर्याचा धक्का

‘पवारांवरील टीका म्हणजे विकृती’; केतकी चितळेच्या पोस्टवरुन जितेंद्र आव्हाड बरसले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here