आगरताळा : भाजपनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलाची परंपरा कायम ठेवली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी आज राजीनामा दिला आहे. बिप्लब देव यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहा यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. माणिक साहा यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

माणिक साहा यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आल्यानंतर बिप्लब देव यांनी ट्विट करुन माणिक साहा यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात त्रिपुराचा विकास होईल, असंही बिप्लब देव म्हणाले आहेत.
ज्येष्ठ नेत्यांबद्दल काय बोलतोय याचं भान हवं, देवेंद्र फडणवीस यांचे केतकी चितळेला खडे बोल
मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल एस एन आर्य यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. देव यांनी माझ्यासाठी पक्ष सर्वात वर असल्याचं म्हटलं. मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. माझ्याकडे जी जबाबदारी दिली होती, त्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न असं मला वाटतं, असं देव म्हणाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचं काम असेल किंवा मुख्यमंत्री म्हणून काम असेल, मी न्याय देण्याचं काम केलं असं, देव म्हणाले.
अजितदादा म्हणतात, ‘असल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं असतं’
२०२३ मध्ये निवडणूक
त्रिपुरा विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. बिप्लब देव यांच्याबद्दल पक्ष नेतृत्त्वाकडे तक्रार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वानं मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेतला आहे. भाजपनं यापूर्वी गुजरात, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले आहेत. भाजपनं महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते विनोद तावडे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्रिपुरामध्ये भाजपनं डाव्या पक्षांचा पराभव करत सत्ता मिळवली होती. २०१८ पासून बिप्लब देव हे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

बिपल्ब देव यांच्याविषयी पक्षसंघटनेत असलेल्या नाराजीमुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्यात आले, असं बोललं जात आहे. २०१८ मध्ये भाजपने त्रिपुरामध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर बिप्लब देव यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. देव यांनी केलेल्या काही वक्तव्यावरूनही मोठा वाद झाला होता. तसंच पक्षातील अनेक नेतेही त्यांच्यावर नाराज होते. या नाराजीचा फटका भाजपला २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यामुळे हायकमांडने देव यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती आहे.

चंद्राचं मुखदर्शन व्हावं तसं मुख्यमंत्र्यांचं आज जनतेला दर्शन होतंय | सदाभाऊ खोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here