नवी मुंबई:शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह भाषेत टीका करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर महिला कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली. केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर आणण्यात आले तेव्हा हा प्रकार घडला. तिला पोलीस गाडीत बसवत असताना अचानक काही महिला कार्यकर्त्यांनी तिच्या अंगावर शाईफेक केली. तसेच केतकी चितळे हाय हायच्या घोषणा दिल्या. या झटापटीत केतकी चितळे पोलिसांच्या गाडीत खालीही पडली. विशेष म्हणजे शाईफेक झाल्यानंतर केतकी चितळे हसत होती. दरम्यान आता पोलीस केतकी चितळे हिला अटक करणार का, हे पाहावे लागेल.

हेही वाचा – मोठी बातमी: केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात, अटक होणार?

केतकी चितळेवर गुन्हा दाखल

ठाणे पोलिसांनी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला ताब्यात घेतलं होतं. आज सकाळीच ठाण्यात आणि त्यानंतर पुण्यात पोलिसांनी केतकी चितळे हिच्यावर गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर पोलीस केतकी चितळे हिला ताब्यात घेतलं. केतकी चितळेला नवी मुंबईच्या कळंबोली येथून ताब्यात घेण्यात आलं होतं. ठाणे गुन्हे शाखा घटक १ ने ही कारवाई केली. ठाणे गुन्हे शाखा घटक १ ने केतकी चितळेचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले होते. त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात केतकीच्या जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर जेव्हा ती कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर पडली तेव्हा तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाईफेक केली.

केतकी चितळेविरोधात आतापर्यंत ठाणे, पुणे आणि सातारा अशा तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रार दाखल केलीये. तर, केतकी चितळेविरोधात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतकी चितळे हिच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

शरद पवारांबाबत शेलक्या भाषेत पोस्ट

केतकी चितळेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केलीये. तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, अशी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केतकी चितळेने केली.

केतकी चितळेची पोस्ट

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला पडणार महागात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here