शेवटी गाढव ते गाढव, आम्ही त्यांना लाथ मारली; फडणवीसांच्या ‘गदाधारी’ला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर – cm uddhav thackeray speechrally in bkc mumbai slams devendra fadanvis and bjp leaders
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर विविध गंभीर आरोप करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा घेत मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केला आहे.
शेवटी गाढव ते गाढव, आम्ही त्यांना लाथ मारली; फडणवीसांच्या ‘गदाधारी’ला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
हायलाइट्स:
मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले
बीकेसीतील सभेतून भाजपवर जोरदार हल्लाबोल
विविध आरोपांना दिलं प्रत्युत्तर
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. ‘महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र म्हणजे काय हे ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी आम्हाला बोलावं लागतं. खोट्या हिंदुत्वाचा बुरखा घातलेला एक पक्ष आपल्यासोबत होता, तो आज देशाची दिशा भरकवटत आहे. मी मागे म्हटलं होतं की आमचं हिंदुत्व घंटाधारी नाही तर गदाधारी आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवसेनेचं हिंदुत्व गधादारी आहे. आमचे तुमच्यासोबत जुने फोटो बघून तुमचा तसा गैरसमज होत असेल. मात्र आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गध्याला सोडून दिलं आहे. शेवटी गाढव ते गाढवच, गाढवाने आम्हाला लाथ मारण्याआधी आम्हीच त्यांना लाथ मारली,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं आहे.