मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या बीकेसी येथील सभेत केलेल्या घणाघाती टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे भाषण संपताच काही मिनिटांतच ट्विट केले. या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. तसेच ‘जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा’, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना आणि भाजपमध्ये नव्याने वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. (Devendra Fadnaivs takes a dig at CM Uddhav Thackeray)
शेवटी गाढव ते गाढव, आम्ही त्यांना लाथ मारली; फडणवीसांच्या ‘गदाधारी’ला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

सर्वत्र पळापळ अन् गदारोळ,नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…

अरे छट हा तर निघाला…आणखी एक ‘ #टोमणे बॉम्ब’…

जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!!
तुम्ही बाबरीवर चढला असता तर तुमच्या वजानानेच बाबरी कोसळली असती: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवर खोचक टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत बाबरी मशिदीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोडून काढला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना शाब्दिक चिमटाही काढला. बाबरी पडली तेव्हा अयोध्येत शिवसैनिक नव्हते, मी तेथे गेलो होतो, असे फडणवीस म्हणतात. अरे त्यावेळी तुमचं वय काय होतं? तेव्हा अयोध्येला शाळेची किंवा कॉलेजची सहल गेली होती का? तुमचं वय काय होतं, तुम्ही बोलताय काय? तुम्ही आमच्यावर शंका घेता मग मी देखील देवेंद्र फडणवीसांना एक सवाल विचारतो, तुम्ही देशासाठी सोडा हिंदुत्वासाठी काय केलं, हे सांगा. भाजपने बाबरी पाडलीच नाही. पण देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याठिकाणी असतात आणि बाबरी मशिदीवर नुसता चढायचा प्रयत्न केला असतात तर तुमच्या वजनानेच बाबरी मशीद खाली आली असती. कारसेवकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही एक पाय जरी टाकला असता तर बाबरी मशीद खाली आली असती, अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here