एफबीआयच्या एका टीमकडून संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. हल्लेखोरानं हेल्मेट घातलं होतं त्यातील कॅमेरावरुन गोळीबाराच्या घटनेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. सुपर मार्केटच्या पार्किंगमध्ये पोहोचल्यावर गाडीतून खाली उतरताच हल्लेकोरानं गोळीबाराला सुरुवात केली. लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये गोळीबार आणि मृत व्यक्ती देखील दिसून आले आहेत.
प्रशासनानं हा हल्ला वर्णभेदातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी १८ वर्षाच्या बंदुकधारी हल्लेखोरानं गोळीबार केला असून तो गौरवर्णीय असल्याची माहिती दिली. हल्लेखोरानं लष्करी कपडे परिधान केले होते, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्र होती, असं म्हटलं आहे. पोलीस आयुक्त जोसेफ ग्रॅमागलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखारानं हा घटनेचं थेट प्रक्षेपण देखील केलं आहे.
पोलीस आयुक्त ग्रमागलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरानं सुपरमार्केटबाहेर चार जणांवर गोळीबार केला त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. सुपरमार्केटमधील सुरक्षा रक्षकांनं हल्लेखोरावर गोळीबार केला मात्र बुलेटप्रुफ जॅकेट घातलं असल्यानं तो बचावला असं देखील पोलिसांनी सांगितंल. मात्र, त्यानंतर त्यानं सुरक्षरक्षकाला देखील मारल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी या घटनेत ११ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे. त्यात कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय लोकांचा समावेश आहे. पोलिसांनी सुपरमार्केटमध्ये घुसून हल्लखोराला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित हल्लेखोराचं नावं पेटोन जेनड्रोन असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत गेल्यावर्षी मार्च २०२१ मध्ये देखील एका मॉलमध्ये गोळीबार झाला होता, त्यात १० जणांचा मृत्यू झालेला.
नवी मुंबईतून ठाण्यात आणलं, केतकी चितळेला अखेर अटक