मात्र, याच पैशांमुळे अँड्र्यू सायमंडस आणि मायकेल क्लार्क यांची मैत्री तुटली होती. आयपीएलमध्ये सायमंडसला मिळालेल्या सर्वाधिक मानधनामुळे या दोघांची मैत्री तुटली होती. अँड्र्यू सायमंडसने ‘द ब्रेट ली पॉडकास्ट’ (The Brett Lee Podcast) या कार्यक्रमात याबद्दल खुलासा केला होता. आयपीएलमध्ये माझ्यावर सर्वात मोठी बोली लागल्यामुळ मायकेल क्लार्कच्या मनात माझ्याविषयी असूया निर्माण झाली होती. मायकेल क्लार्कने ऑस्ट्रेलियन संघात खेळायला सुरुवात केली तेव्हा आम्ही एकत्र फलंदाजी करायचो. मी त्याची खूप काळजी घ्यायचो. त्यामुळे आमच्यात चांगली मैत्री झाली होती. नंतरच्या काळात मॅथ्यू हेडनच्या आग्रहाने मी आयपीएल स्पर्धेत खेळायला लागलो. त्यावेळी मला खूप पैसे मिळाले होते. मात्र, यामुळे क्लार्कच्या मनात असूया निर्माण झाली. परिणामी आमची मैत्री तुटली, असे सायमंडसने सांगितले होते.
पैसा ही मजेशीर गोष्ट आहे. ही गोष्ट चांगली आहे पण त्यामुळे क्लार्क आणि माझ्या नात्यामध्ये वितुष्ट आले. आता आमच्यात मैत्री उरलेली नाही. मला त्याचा पश्चाताप वाटत नाही. पण म्हणून मी कोणावरही चिखलफेक करणार नाही. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामात भारतीय यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यापाठोपाठ अँड्य्रू सायमंडस याच्यासाठी सर्वात मोठी बोली लागली होती.