मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्स (Andrew Symonds) याचा कार अपघातात शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे.अँड्रयू सायमंड्स हा त्याच्या कार मधून क्वींसलांड प्रांतातील टाऊनस्विल्ले मधून प्रवास करत होता, अशी प्राथमिक माहिती आहे. अँड्रयू सायमंड्स च्या निधनानं क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अ‌ॅडम गिलख्रिस्ट, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी सायमंड्सच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग (Harabhajan Singh ) यानं ट्वीट करत सायमंड्सच्या निधनाची बातमी ऐकन धक्का बसल्याचं म्हटलं आहे.
मैदानात हरभजनशी भिडणाऱ्या सायमंड्सवर काळाचा घाला, कार अपघातात निधन
हरभजन सिंग काय म्हणाला?
अँड्रयू सायमंड्सच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. खूप लवकर गेलात, माझ्या तुमच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आहेत, असं ट्विट हरभजन सिंग यानं केलं आहे. हरभजन सिंग आणि सायमंड्स यांच्यात २००८ मध्ये सिडनी कसोटीत मंकीगेट वाद झाला होता.

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अँड्रयू सायमंड्स हा दोन वेळा विश्वकप जिंकलेल्या टीमचा भाग राहिलेला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया साठी २६कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. त्याची एक दिवसीय सामन्यांमधील कामगिरी चांगली राहिली. त्यानं १९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन टीममध्ये प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यानं सहा शतक आणि तीस अर्धशतक लगावली तर गोलंदाजी करताना त्याने एकदिवसीय सामन्यात १३३ विकेट घेतल्या.

सायमंड्सची २००३ च्या विश्व कप स्पर्धेत जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तान विरोधात केलेली १४३ धावांची खेळी लक्षात राहिली. याशिवाय भारताविरुद्धच्या अंतिम फेरीतील सामने देखील त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण राहिली. सायमंड्सनं १४ टी-२० सामने खेळले यामध्ये त्यांनं ३३७ धावा केल्या आणि ८ विकेट घेतल्या.
Andrew Symonds Death: अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू, चाहत्यांमध्ये शोककळा पसरली
ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अ‍ॅडम गिलख्रिस्ट यानं सायमड्सच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ही बातमी अतिशय दु:खद असून मन हेलावून टाकणारी आहे, असं तो म्हणाला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यानं देखील सायमंड्सच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून तो खेळत असतानाच्या अनेक आठवणी असल्याचं तो म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here