अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. सायमंड्स स्वतः कार चालवत होते. अचानक त्यांची कार रस्ता सोडून उलटली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन सेवांनी सायमंडला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो जखमी झाला. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी एका निवेदनातून दिली आहे. त्याच्या जाण्याने क्रिकेटमधून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया येत आहेत.
मैदानात हरभजनशी भिडणाऱ्या सायमंड्सवर काळाचा घाला, कार अपघातात निधन
अवघं क्रिकेट विश्व अँड्र्यू सायमंड्च्या अपघाती मृत्युने हळहळलं…
अवघं क्रिकेट विश्व अँड्र्यू सायमंड्च्या अपघाती मृत्युने हळहळलं आहे. आपल्या वादळी खेळीत सामना जिंकवण्याची धमक सायमंडमध्ये होती. आपल्या फिरकी गोलंदाजीने त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला अनेकदा अडचणीतून बाहेर काढलं आहे. क्षेत्ररक्षणातही तो अव्वल होता. ओठाला पांढरा रंग लावून खेळणाऱ्या अँड्र्यू सायमंड्ला विसरणे अशक्य आहे. तो आज आपल्यात नाही. यावर अनेकांना विश्वास बसत नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड त्याच्या जाण्याने पार हळहळलं आहे.