जळगाव : शहरात शुक्रवारी कारवाई करत महापालिकेच्या पथकाने ६ टन प्लास्टिक बॅग जप्त केल्या. ह्या बॅग पर्यावरण संवर्धनासाठी व प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक असतात याचा प्रत्यय शनिवारी पाहण्यास मिळाला. जिल्हा पशु संवर्धन विभागात एका भटक्या गायीवर केलेल्या शस्त्रक्रियेत तिच्या पोटात तब्बल ५५ किलो प्लास्टिक आणि पैशांची नाणी मिळून आले आहेत. या गाईला जीवदान देण्यास वैद्यकीय अधिकारी यशस्वी ठरले आहेत.

पोटात तब्बल ५५ किलो प्लास्टिक बॅग, खिळा, एक-एक रुपयाचे दोन नाणे…

हरीविठ्ठल नगरात एक गाय सुस्त पडून होती. यामुळे परिसरातील नागरिकांनी तिला महाबळ येथील जिल्हा पशु सर्वचिकित्सालयात दाखल केले. पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. मनीष बाविस्कर, पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश चोपडे, सहायक प्रफुल जोशी, किशोर जानवे यांच्या वैद्यकीय पथकाने या गायीची शर्तीचे प्रयत्न करून शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तब्बल ५५ किलो प्लास्टिक बॅग, खिळा, एक-एक रुपयाचे दोन नाणे बाहेर काढण्यात आले.

Andrew Symonds Death: अँड्र्यू सायमंड्च्या निधनानंतर मास्टर ब्लास्टर तेंडूलकरने दिला जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाला…
पचनक्रिया बंद पडल्याने गाय सुस्त…

नागरिक भाजीपाला उर्वरित कचरा प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये टाकून फेकून देतात. जनावरे तो कचरा चारा समजून ती प्लास्टिक कॅरीबॅग देखील खात असतात. याचप्रमाणे या गायीने देखील वर्षानुवर्षे अशा प्रकारचे प्लास्टिक खाल्याने तिच्या पोटात हे सर्व साचत गेले. आज तिच्या पोटात प्लास्टिक शिवाय काहीच नव्हते. यामुळे तिला श्वास घेण्यासाठी त्रास होवू लागला होता. तिची पचनक्रिया बंद पडल्याने ती एकदम सुस्त पडलेली होती. नागरिकांनी भाजीपालाचा उर्वरित भाग प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये न टाकता केवळ कागदात किंवा असाच टाकून द्यावा, असे आवाहन डॉ. मनीष बाविस्कर यांनी यावेळी केले आहे.

अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू, चाहत्यांमध्ये शोककळा पसरली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here