परभणी : गावाशेजारी असलेल्या गोट्याला अचानक आग लागून सात शेळ्यांचा जळून मृत्यू झाला आहे. तर आगीमध्ये १२ पिल्लेही होरपळली आहेत. सदरील घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील बोरकिन्ही गावामध्ये घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकरी मारुती हावळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

शेतकरी मारुती हावाळे यांचा होता गोठा…

सेलू तालुक्यातील बोरकीन्ही गावाशेजारी शेतकरी मारुती हावाळे यांचा गोठा आहे. त्यांनी गोठ्यामध्ये शेळ्या बांधून नियमित प्रमाणे आपल्या घराकडे गेले होते. मात्र, शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गोट्याला अचानक आग लागली. या आगीमध्ये गोठ्यात बांधलेल्या सात शेळ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर या आगीमध्ये शेळ्यांची १२ पिल्ले होरपळून गंभीर जखमी झाली आहेत. आगीमुळे शेतकरी मारुती हावळे यांचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

खासदाराच्या मुलाचा लग्न सोहळा; अजित पवार आणि फडणवीसांची एकत्र उपस्थिती

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट…

बोरकीन्ही हे गाव सेलू तालुक्यात असले तरी गावाला चारठाणा पोलीस ठाणे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनातील अधिकारी व महसूल प्रशासनातील कर्मचारी रविवार १५ मे रोजी घटनास्थळाला भेट देणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ग्रामस्थांच्या मदतीने गोट्याला लाभलेल्या विझवण्यात आली आहे.

मोठी बातमी: केतकी चितळेची १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here