विमान उड्डाणापूर्वी आपत्कालीन दरवाजाजवळ बसलेल्या व्यक्तीला एअर होस्टेसकडून याबाबत सूचना दिल्या जातात. कोणत्या वेळी आपत्कालीन दरवाजा उघडायचा असतो कोणत्या वेळी नाही, याबाबत प्रवाशांना सूचना दिलेल्या असतात. मात्र, शिकागोच्या ओ हेर विमानतळावर यूनाएटेड एअरलाइन्सच्या विमानाचं लँडिंग सुरु होतं. विमान टर्मिनलच्या दिशेनं जात असताना आपत्कालीन दरवाजाजवळ बसलेल्या व्यक्तीनं तो दरवाजा उघडला. विमानातून ती व्यक्ती बाहेर पडली आणि विमानाच्या पंखावर गेली. पुढे पंखावरुन थोडं चालल्यावर त्यानं उडी मारली. या घटनेमुळं विमानतळावर खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लाइट २४७८ मधील त्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. ती व्यक्ती कॅलिफोर्नियातील एस्कॉन्डियो येथील आहे. त्या व्यक्तीचं वय ५७ वर्ष आहे. बेजबाबदार वर्तनाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना ५ मे रोजी पहाटे ४.३१ वाजता घडली आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
विमान जेव्हा शिकागोच्या ओ हेर विमानतळावर पोहोचलं आणि लँडिंगची प्रक्रिया सुरु होती त्यावेळी त्या व्यक्तीनं अचानकपणे आपत्कालीन दरवाजा उघडला आणि विमानाच्या पंखावर गेली आणि विमानाची लँडिंग सुरु असताना त्या व्यक्तीनं पंखांवरुन उडी मारली. या घटनेनंतर विमानतळावर खळबळ उडाली. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी तातडीनं त्या व्यक्तीला ताब्यात घेतल.आप्तकालीन दरवाजातून बाहेर पडलेल्या व्यक्तीला विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे. या विमानातून प्रवास करणारे इतर प्रवासी सुरक्षित आहेत.
शरद पवारांवर टीका करणाऱ्या केतकी चितळेवर शाईफेक, केतकी पोलिसांच्या ताब्यात