मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे हे पत्रकारांशी बोलत होते. ‘गिरीश महाजन शिवसेनेला गटारीतील बेडूक म्हणतात. याची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली पाहिजे व शिवसेना बेडूक आहे की हत्ती आहे’, असे गिरीश महाजनांना दाखवून दिले पाहिजे. गिरीश महाजन सातत्याने उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेवर टीका करत असतात. मात्र याचे उत्तर तरी अद्यापपर्यंत शिवसेनेकडून आलेलं नाही शिवसेना का उत्तर देत नाही याचं कारण मलाही समजू शकलेलं नाही, असा प्रश्नही एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला. यातून एकंदरीतच सरकारने गिरीश महाजनांना इंगा दाखवावाच, असंच मत अप्रत्यक्षरीत्या एकनाथ खडसेंनी व्यक्त केले.
बेडूक म्हणणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासोबतच सेनेच्या मंत्र्याची जळगाव जिल्ह्यात उठबस…
तर ‘सेनेला बेडूक म्हणणार्या गिरीश महाजनांसोबतच शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील चहा घेतात , जेवण करतात व युती कशी करतात’, असा प्रश्न उपस्थित करत मंत्री गुलाबराव पाटील यांनाही टोला लगावला आहे.
केतकी चितळेवर कारवाई बद्दल सरकारचे अभिनंदन…
अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याविरुद्ध केलेल्या पोस्टचे आहे एकनाथ खडसे यांनी या वेळी जोरदार समाचार घेतला. केतकी चितळेवर संस्कारांची कमी झालेले आहे . तिच्या अशा वागण्यातून तिच्यावर झालेले संस्कार बाहेर पडत आहेत. आणि या संस्कारांमुळेच ती मनोरुग्ण प्रमाणे काहीही बडबड करत आहे. अशा पध्दतीने एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याबद्दल बोलणेही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र, केतकी चितळेवर केलेल्या कारवाईबद्मल मी सरकारचे अभिनंदन करतो व अशा पध्दतीने कुणीही आक्षेपार्ह व अश्लील बोलत असेल पोस्ट करत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, असे मतही यावेळी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.
आता Aadhaar मध्ये नाव, पत्ता आणि जन्म तारीख मध्ये दुरूस्त करणे झाले एकदम सोपे